Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समिती नेत्यांमध्ये बैठक, या मुद्द्यांवर चर्चा?
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक आज पार पडली. मु़ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी महावाकिस आघाडीच्या समन्वय समितीच्या नेत्यांमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन संदर्भातील रणनिती तसेच विधानसभा अध्यक्ष पद निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा झाली. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते.
बैठकीत काय झालं?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. सीबीआयतर्फे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केली आहे. विरोधकांनी अजित पवार आणि अनिल परबांच्या विरोधात दिलेल्या पत्राबाबत चर्चा झाली. अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर केंद्राकडून कारवाईसाठी दबाव आणत असल्याची चर्चा झाली.