Akola Murder Case: अकोला जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्येचा थरार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर तालूक्यातील समशेरपूर येथे प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्याकांड घडलं आहे. हत्याकांडात प्रियकर धम्मपाल उर्फ संदेश आटोटे याची चाकू आणि कोयत्याने हत्या करण्यात आली आहे. तर मुलीच्या वडिलांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली आहे. मुलीचे वडिल दिपकराज यांनी प्रियकर धम्मपाल याच्यावर हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर धम्मपालच्या हत्येनंतर नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात मुलीचे वडील दिपकराज गंभीर जखमी झाले होते. त्यांचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतक प्रियकर धम्मपाल औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थी आघाडीचा सक्रीय पदाधिकारी होता. तर मुलीचे मृतक वडील दिपकराज डोंगरे अॅक्शन फोर्स शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. धम्मपाल उर्फ संदेश याचं दिपकराज यांच्या मुलीवर प्रेम होतं. मुलीचे वडील दिपकराज यांचा या प्रेमाला विरोध होता. औरंगाबाद येथे राहत असलेला धम्मपाल दोन दिवसांपूर्वी आपल्या नात्यातील लग्नासाठी समशेरपूर या आपल्या मूळगावी आला होता. या हल्ल्यात मृतक प्रियकराचा भाऊही गंभीर जखमी झाला. यात दोन्ही बाजूंनी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.