Medha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!
Continues below advertisement
पुण्यातील ड्रग प्रकाणरावरून आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनीदेखील या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल आहे. धंगेकरांनी यापूर्वी अनेक बार मालकांचे आणि हप्त्यांचे कागद दाखवले होते. त्याचं पुढे काय झाल? एक प्रकरण धरतात सोडून देतात… दुसर धरतात सोडून देतात? त्या कागदाच काय झाल ते आधी सांगा म्हणत मेधा कुलकर्णी यांनी धंगेकराना जाब विचारला आहे. आम्ही एखादा मुद्दा उपस्थित करतो आणि शेवटपर्यंत नेतो मध्येच सोडत नाही - धंगेकरांना टोला पुण्याची प्रतिमा मलिन होऊ देणार नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करू पुण्यातील ड्रग प्रकरणावर पुणे पोलीस धडधड कारवाई करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत
Continues below advertisement