Massive Fire: Bhiwandi मधील मंगलमूर्ती डाईंग जळून खाक, मोठ्या प्रमाणात धूराचे लोट, लाखोंचं नुकसान

भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील सरवली एमआयडीसी (Saravali MIDC) परिसरातील मंगलमूर्ती डाईंग (Mangalmurti Dyeing) कंपनीला भीषण आग लागल्याने संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. 'आगीमुळे उठलेला धूर जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतरावरून दिसत होता,' अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे. या कंपनीमध्ये कपड्यांचा मोठा साठा असल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. ही आग विझवण्यासाठी भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola