Delhi Blast : ‘आयुष्यात इतका मोठा आवाज ऐकला नाही’, लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटावर प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. ‘माझ्या आयुष्यात मी इतका मोठा आवाज कधीच ऐकला नाही,’ अशी प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शीने दिली. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आजूबाजूच्या तीन ते चार गाड्यांना आग लागली आणि मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या घटनेनंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, अधिकारी स्फोटाच्या कारणाचा तपास करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement