Voter List: मतदार यादीतील नाव दुरुस्त न झाल्यास, मनसेचा स्टाईल आंदोलनाचा इशारा

Continues below advertisement
मुंबईतील चारकोप (Charkop) विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये मराठीऐवजी गुजराती (Gujarati), बंगाली (Bengali), आणि तमिळ (Tamil) भाषा आढळल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. 'अक्षरशः महाराष्ट्रमध्ये मराठी भाषेचा अपमान झालेला आहे, हे महाराष्ट्र आहे, मराठी इकडची मातृभाषा आहे,' असा संतप्त सवाल मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकाराचा निषेध करत मनसेने निवडणूक अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि याद्या दुरुस्त न केल्यास 'मनसे स्टाईल' आंदोलनाचा इशारा दिला. दुसरीकडे, पुणे (Pune) येथील दिनेश घायघोर प्रकरणात पुणे पोलिसांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ED) पत्र लिहून आर्थिक तपासाची मागणी केली आहे. घायघोरने पुणे आणि जामखेडमध्ये ६० हून अधिक जमीन व्यवहार केले असून, त्यात कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचा संशय पोलिसांना आहे. आता या प्रकरणाचा तपास ईडी करणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola