Markadwadi Protest : व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा दावा

Continues below advertisement

Markadwadi Protest : व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा दावा 

 माळशिरसमधील मारकडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आज, सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मारकडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आले आहेत.  गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे. मारकडवाडी गावकऱ्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत मंगळवारी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं जाहीर केलं होतं. 

मारकडवाडीमध्ये मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली. यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान घेऊ शकत नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबल्यास त्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

माळशिरच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर यांनी तसे आदेश जाहीर केले आहेत. भारतीय न्याय संहितेचे कलम 163 नुसार ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जर आदेशाचे भंग करून मतदान प्रक्रिया राबविली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram