Markadwadi :निवडणूक कशावरही घ्या;मोहिते पाटलांच्या उमेदवाराला 55 गावातून कमीच मतं मिळणार
Markadwadi :निवडणूक कशावरही घ्या;मोहिते पाटलांच्या उमेदवाराला 55 गावातून कमीच मतं मिळणार
मारकडवाडी (Markadwadi) येथील ईव्हीएम विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे खरे वास्तव आज ईव्हीएमला (EVM) पाठिंबा देणाऱ्या ग्रामस्थांनी समोर आणले आहे. मारकडवाडी हे एक गाव नसून या परिसरातील जवळपास 55 गावे हे कायम मोहिते पाटील यांच्या विरोधात मतदान करत आलेली आहेत. आमचा विरोध उत्तम जानकर यांना नाही तर ते मोहिते पाटील यांचे उमेदवार असल्याने तो विरोध मतदानातून दिसल्याचे ग्रामस्थ सांगतात. मोहिते पाटलांची इतकी वर्ष सत्ता असून माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात त्यांना कायमच विरोध होत आलेला आहे. आजही होतो आणि उद्याही राहील अशी ठाम भूमिका ही ग्रामस्थांनी घेतली आहे. मोहिते पाटलांची वर्षानुवर्ष सत्ता असूनही या भागाचा कधीही विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. उलट कायम तालुक्याच्या पश्चिम भागावर अन्याय केल्याची भूमिका लोकांच्या मनात रुजली असल्याचे ग्रामस्थ सांगतात. हा धनगर बहुल भाग असून मोहिते पाटील यांनी अगदी धनगर समाजाचा उमेदवार दिला तरी देखील त्याचा पराभव करण्याचा प्रयत्न या भागातील लोक करतात, हा इतिहास असल्याचे ग्रामस्थ सांगतात.