Kurla Buss Accident Driver Beatnup : कुर्ला बस अपघातातील चालकाला जमावाची मारहाण

Kurla Buss Accident Driver Beatnup : कुर्ला बस अपघातातील चालकाला जमावाची मारहाण

बईतल्या कुर्ला बेस्ट अपघातात (Kurla Best Bus Accident) 5 जणांचा मृत्यू झाला आहे. काल (9 डिसेंबर) रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. ही धडक एवढी तीव्र होती की यात 5 जणांचा मृत्यू झालाय. 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.  विजय विष्णू गायकवाड, आफ्रीन अब्दुल सलीम शहा, अनम शेख, फातिमा गुलाम कादरी, शिवम कश्यप अशी मृतांची नावं आहेत. बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय. 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola