Marathwada Water Shortage : मराठवाड्यात अजूनही 1 हजार 980 गावात टँकर
Marathwada Water Shortage : मराठवाड्यात अजूनही 1 हजार 980 गावात टँकर
मराठवाड्यात मान्सूनचं आगमन एक दिवस आधीच झालंय. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस अक्षरश: धो-धो कोसळला. मराठवाड्यातील धरणांसह अनेक जलाशयांना दिलासा मिळाला. नद्या आणि नाले ओसंडून वाहू लागल्या. काही नद्यांना तर पूर आला. दुष्काळामुळे होरपळलेल्या मराठवाड्याच्या भूमीवर पावसाचा शिडकावा पडल्यामुळे, काहीसा आनंदी ओलावा निर्माण झाला. एकीकडे वरूण राजाने मराठवाड्यावर अशी आशीर्वादाची चादर धरलेली असताना, दुसरीकडे मराठवाड्याचा घसा मात्र कोरडाच आहे. कारण, अजून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील गावांची आणि वाड्या-वस्त्यांची तहानेसाठीची मदार टँकरवरच अवलंबून आहे. परिणामी, पावसाचं दमदार आगमन झालेलं असतानाही, मराठवाड्यातील टँकरची संख्या मात्र अद्याप घटलेली नाही. आजही मराठवाड्यातील तब्बल १ हजार ९८० गावांची तहान २ हजार २४ टँकर भागवतायत. अशा सगळ्या परिस्थितीत टँकर लॉबी सक्रिय झाल्याचीही चर्चा मराठवाड्यात रंगलीय.