Sunetra pawar Vs Chhagan Bhujbal : सुनेत्रा पवार राज्यसभेवर, भुजबळ नाराज?

Continues below advertisement

बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांची अखेर राज्यसभेत बिनविरोध निवड झाली आहे. आज त्यांनी विधानसभेत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानतंर अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. परंतु, ३ वाजेपर्यंत सुनेत्रा पवारांशिवाय कोणाचाही अर्ज न आल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध झाली. आज त्यांनी दुपारी विधानसभेत जाऊन उमेदवारी अर्ज भरला. महायुतीच्या वतीने भाजपाच्या कोट्यातून त्यांनी हा अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या, “पक्षाने मला राज्यसभेची अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram