Marathwada Rainsमराठवाड्यात अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा,जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन सूचना
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. पावसादरम्यान केल्या जाणाऱ्या मदत कार्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. "आपत्तीच्या काळामधे सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवरती राहून काम करावं" असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चारा टंचाई असलेल्या जिल्ह्यांमध्ये चारा पुरविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये धरणांचे विसर्ग वाढवले आहेत, त्या भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या संदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. मदत कार्य व्यवस्थित पोहोचले पाहिजे यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.