Heavy Rain Ahilyanagar | अहिल्यानगरमध्ये झेंडू शेतीचं नुकसान, शेतकरी संकटात
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात काल रात्रीपासून ढगफुटी सदृश पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळे झेंडू फुलांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी सांगितलं, "गुडघाभर पाण्यामध्ये ही सगळी फुलशेती वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे." केवळ फुलशेतीच नव्हे तर ऊस, द्राक्ष आणि इतर पिकांमध्येही पाणी साचलं आहे. तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काल रात्रीपासून 125 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्ण राहाता तालुक्यात शंभर टक्के नुकसानीचा अंदाज वर्तवला जात आहे. पंचनामे कधी होणार आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार का, हे महत्त्वाचं आहे. मराठवाडा, विदर्भातही अशाच पद्धतीनं पाऊस झाल्याची नोंद आहे.