Marathwada Rain Deficit | मराठवाड्यात पिके सुकली, दुबार पेरणीचं संकट; शेतकरी चिंतेत
लातूरसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिनाभरापासून पावसाने उघडीप घेतली आहे. यामुळे कोवळी पिके सुकत आहेत आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना सांगितले, "पंधरा एकर सोयाबीन आमच्या शतांमध्ये आहे। वीस, वीस दिवसापूर्वी पाऊस झाल्यामुळे आता पिकं ही मान टाकून देत आहेत. आम्ही जग-या पिकाला जगविण्यासाठी धडपड करत आहोत. पण त्यातही लाइटची समस्याही मोठ्या प्रमाणावर भेडसू होत आहे." पावसाअभावी शेतात भेगा पडल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात पंच्याऐंशी टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी, पावसाच्या कमतरतेमुळे पिकांची वाढ खुंटली आहे आणि पंधरा टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.