Marathwada Rain : मुख्यमंत्रीसाहेब हे वास्तव पाहाच! पिकांसह जमीन खरडून नेली, शेतकऱ्यांनी कसं सावरावं?
Continues below advertisement
मुसळधार पावसानंतर शेतातील उभी पिके कशी उध्वस्त झाली की आम्ही तुम्हाला आतापर्यंत दाखवले पण मुसळधार पावसानंतर रौद्ररूप धारण केलेली वान नदी चक्क शेतामध्ये अवतरली आणि याच नदीच्या पाण्यात शेकडो एकर वरच्या जमिनी खरडून गेल्यात.. वाण नदीच्या पात्रातून एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.. अंबाजोगाईच्या डोंगरदऱ्यातून वाहून येणारे हे पाणी याच वान नदी द्वारे परळीच्या वान धरणाला जाऊन भेटते तीन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला आणि वान नदीने आपले रौद्ररूप दाखवले नदीच्या मूळ पात्रापासून अर्धा किलोमीटर पर्यंत नदी शेतात घुसली आणि उभ्या पिकातून ही नदी वाहू लागली.. अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा गावातील शेतकरी विनोद गुजर आपल्या शेतातील दगड बांधावर टाकतायेत.. याच जमिनीवर आठ एकर मध्ये सोयाबीन पेरले होते मात्र वाण नदी ने प्रवाह बदलला आणि पाणी थेट शेतात घुसले तीन दिवसा नंतर ही नदीचे पाणी शेतातून वाहत आहे विनोद गुजर एक एक दगड उचलून टाकल्याने पुन्हा ही शेत जमीन तयार होणार कशी असा प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा टाकलाय..
Continues below advertisement
Tags :
Raj Thackeray Maharashtra Rain Rain Update Maharashtra Rain Update Marathwada Rain Weather Report Vijay Wadettiwar Jalyukta Shivar Scheme Marathwada Rain