Marathi Medium School नामशेष होण्याच्या मार्गावर, शिक्षकांची 64 टक्के पदं रिक्त

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठी माध्यमातल्या शिक्षकांची तब्बल 64 टक्के पदं रिक्त आहेत. ही आकडेवारी एप्रिल २०२२ ते जून २०२२ पर्यंतची आहे. मराठी माध्यमातल्या शिक्षकांची तीन हजार २१३ पदं असून त्यापैकी दोन हजार ५९ पदं रिक्त आहेत. मराठी शिक्षकांची निम्म्याहून अधिक पदं रिक्त असल्यामुळं त्याचा परिणाम मराठी माध्यमाच्या शाळांवर होत आहेत. चांगले शिक्षकच हुशार विद्यार्थी घडवतात याकडे मुंबई महापालिकेनं गेल्या काही वर्षांत पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. सध्या बीेमसी व्हर्च्युअल क्लासेसवर करोडो रुपये खर्च करतंय. त्यापेक्षा मराठी शिक्षकांची रिक्त पदं भरली तर बेरोजगार मराठी तरुणांना रोजगाराची संधी मिळेल असं द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशनच्या जितेंद्र घाडगे यांनी म्हटलं आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola