Marathi Hindi Row | 'पटक-पटक के मारेंगे' वादावर Fadnavis यांची भूमिका स्पष्ट, Raut यांचा हल्लाबोल
निशिकांत दुबे यांच्या 'पटक-पटक के मारेंगे' या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "निशिकांत दुबेचं वक्तव्य चुकीचंच आहे." तसेच, निशिकांत दुबे मुंबईत आल्यास त्यांच्याशी गैरवर्तन होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. ज्यांना मराठी येत नाही, त्यांना मारणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. दरम्यान, संजय राऊत यांनी निशिकांत दुबे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांवरही जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायघड्या घालणारे आणि थुकी चाटणारे हे भाजपवाले आहेत, असे राऊत म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ६, ७ आणि ८ तारखेला दिल्लीमध्ये येत आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यात हे सर्व विषय घेतले जातील.