Police Atrocity | मुलींना मारहाण, जातिवाचक शिवीगाळ; पोलिसांवर Atrocity चा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुण्यात मुलींना मारहाण आणि जातिवाचक शब्दांत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांकडे दाद मागितली आहे. मात्र, पोलिसांकडून कोणतीही दाद मिळत नसल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. पुणे पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांशी संपर्क साधून तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांविरोधात Atrocity चा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सुप्रिया सुळेंनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीची मागणी केली आहे. ABP Majha शी बोलताना एका मुलीने सांगितले की, पोलिसांनी त्यांना "तुम्ही अमुल्या आहात, एकट्या राहता म्हणजे तुमचे तुम्ही एलजीबीटीक्यू च्या कम्युनिटीच्या मुली आहात आणि तुम्ही एकट्या राहता म्हणजे तुम्हाला घरच्यांनी सोडून टाकलेलं आहे आणि अअअ तुम्ही असे पोरं घेऊन झोपता का?" असे शब्द वापरले. तसेच, PSI Prema Patil यांनी "तुझ्या अटीट्युडमुळे तुझा एकदिवस मर्डर होईल, तुझा खून करून टाकतील, लोक तुला तू जगू शकत नाही असं तुला जगू देणार नाहीत. ही उघडउघड धमकी आहे. तुझ्यासारख्या कॅरेक्टरलेस मुलीला कुठलंच पोलिस स्टेशन कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही. आणि मग तुझं करिअर आम्ही बरबाद करू," अशी धमकी दिली. संभाजीनगरहून आलेले PSI Kamthe यांनी मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola