Maratha vs OBC | मराठा आरक्षणानंतर OBC समाज आक्रमक, सरकारच्या उपसमिती स्थापनेच्या निर्णयाने वाद मिटणार?
मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी सरकारनं मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पक्षातील दोन मंत्री आणि अधिकारी या उपसमितीमध्ये असतील. मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती, याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपसमितीमार्फत ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि इतर सामाजिक सर्वेक्षण करून संपूर्ण डेटा सरकारकडे जमा केला जाईल. या निर्णयावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, "काल गुलाल पडला, आज होळी करू नये असं मला वाटतंय." छगन भुजबळ यांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांकडून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठा समाजाप्रमाणेच ओबीसींच्या प्रश्नांसाठी ही समिती काम करेल, असेही स्पष्ट करण्यात आले.