Maharashtra Superfast News : 8 AM : 8 च्या अपडेट्स : Maharashtra : ABP Majha

Continues below advertisement
मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha vs OBC) आरक्षणाचा वाद अधिकच चिघळला असून, नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप आपलं ओबीसी डीएनए विसरले का?', असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला आहे. दुसरीकडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्याची आठवण करून देत जिंकलेली मनं न दुखवण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्राच्या (Kunbi Certificate) शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. तसेच, पुण्यातील गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याच्या टोळीतील दोघांना गांजा विकताना अटक करण्यात आली असून, सोशल मीडियावर दहशत पसरवल्याप्रकरणी त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola