Maharashtra Politics: 'टार्गेट OBC नाहीत, Devendra Fadnavis आहेत', Chhagan Bhujbal यांचा मोठा गौप्यस्फोट
Continues below advertisement
OBC नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या वादाच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) आले आहेत. 'त्यांचं टार्गेट OBC नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे', असा थेट हल्ला छगन भुजबळ यांनी केला आहे. बीडमध्ये झालेल्या ओबीसी महाएल्गार सभेत बोलताना भुजबळ यांनी भाजपला इशारा दिला की, ओबीसींच्या ताकदीवर मिळालेल्या सत्तेचा वापर त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी करू नये. दुसरीकडे, मनोज जरांगे-पाटील हे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम करत असल्याचा आरोपही केला जात आहे, ज्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement