Maratha Reservation Special Report : मराठा आंदोलन फोडण्यासाठी सरकार अॅक्शनमोडवर ?
Maratha Reservation Special Report : मराठा आंदोलन फोडण्यासाठी सरकार अॅक्शनमोडवर ? गेली १५ वर्ष मराठा आरक्षणासाठी लढणारे खरे चर्चेत आले ते, अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमारानंतर... त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचा झंझावात असा काही पसरला की, ज्याच्या त्याच्या तोंडी एकच नाव... मनोज जरांगे-पाटील... हजारो सहकारी... लाखो मराठा बांधवांचा जत्थाच्या जत्था सोबतीला... आणि मनोज जरांगेंचा रस्तोरस्ती आणि चौकाचौकात होणारे भव्य दिव्य स्वागत सोहळे... शेकडो किलोंचे हार काय आणि जेसीबीतून तुफान पुष्पवृष्टी काय... नुसता माहोल... सरकारी शिष्टमंडळांशी चर्चा काय आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठका काय... मनोज जरांगेंनी खो म्हणावं आणि आंदोलकांनी धावत सुटावं असं सगळं वातावरण... मात्र याच मनोज जरांगेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलंय... आणि तेही दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, तर कधीकाळी त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनीच... पाहूयात नेमकं काय झालंय? या रिपोर्टमधून...