OBC Reservation : ओबीसी समजाच्या लोकांचं नुकसान कसं होईल ते सांगा, बावनकुळेंचा वडेट्टीवारांना सवाल
राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगींच्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी एक महत्त्वाची बैठक बोलावली. चार सप्टेंबर रोजी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना त्यांनी हे आश्वासन दिले होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसींचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, एका नेत्याने म्हटले आहे की, "मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी, त्या GR मुळे ओबीसींचे प्रचंड नुकसान होणार आहे. जर 'पात्र' हा शब्द पूर्वीच्या GR प्रमाणे ठेवला असता, तर ज्यांच्या जुन्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना आमचा विरोध नाही असे म्हणता आले असते." नेपाळचे गृहमंत्री रमेश रेखक यांनी हिंसक निदर्शनांमध्ये झालेल्या मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.