Dhananjay Munde Beed : पिल्लावळे तयार झाले घर जाळण्यासाठी, कुणालाही संपविण्यासाठी, ते कुणाचे?
Continues below advertisement
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी (OBC) कोट्याच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'ही पिल्लावळं जे आता तयार झाले घर जाळण्यासाठी, कुणालाही संपविण्यासाठी, ते कुणाचे?', असा थेट सवाल करत भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेवरून निशाणा साधला. बीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी समाजाची घरं जाळण्यात आली, तसेच वाघमारे आणि कर्नाड यांच्यासारख्या व्यक्तींना मारहाण करण्यात आली, असा आरोपही भुजबळ यांनी केला. याउलट, आपल्याला मारायला आलेल्या व्यक्तीलाही आपण माफ करून मदत केल्याचे उदाहरण त्यांनी दिले. भुजबळ यांनी जरांगे यांना EWS आणि ओबीसी आरक्षणापैकी कोणत्या आरक्षणात जास्त फायदा आहे, यावर जाहीर चर्चेचे आव्हान दिले असून, यासाठीची तारीख आणि जागा स्वतः जरांगे यांनीच ठरवावी, असे म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement