Chhagan Bhujbal Home Security :छनग भुजबळांच्या आक्रमक भूमिकेनंतर निवासस्थानी पोलीस बंदोबस्त

मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासन आता सतर्क झाले आहे. शासनाने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. "एकूण संपूर्ण ओबीसी समाजासाठी पुन्हा Court मध्ये जाऊ किंवा रस्त्यावरची लढाई लढू," असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. या घोषणेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांनी खबरदारी म्हणून भुजबळ फार्म परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. भुजबळ फार्ममध्ये छगन भुजबळ यांचे कार्यालय आणि निवासस्थान दोन्ही असल्याने नाशिक पोलिसांकडून ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. OBC समाजाच्या हितासाठी छगन भुजबळ यांनी घेतलेली ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola