Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मूक आंदोलन; खासदार संजय मंडलिक यांचं भाषण
कोल्हापूर : आजपासून म्हणजेच, 16 जूनपासून मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात मूक आंदोलन केलं जाणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली होती. 6 जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले होते. आज सकाळी 11 वाजता शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरुन या आंदोलनाला सुरुवात झाली.
आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलनाची सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार असून आज कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी मौन बाळगून तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करुन हे आंदोलन करायचं आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसंर्ग वाढेल असं कोणतंही कृत्य करायचं नाही अशा सूचनाही आंदोलकांना देण्यात आलेल्या आहेत.