Maratha Reservation : मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटीशनवर निकालाची शक्यता
Continues below advertisement
Maratha Reservation : मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटीशनवर निकालाची शक्यता मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्रात खडाजंगी सुरु असतानाच यासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. या याचिकेवरील ही पहिलीच सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने मे २०२१ मध्ये दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झाले होतं. त्याच निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी विनंती राज्य सरकारने या याचिकेद्वारे केली आहे. या क्युरेटिव्ह पिटीशनवरच मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे.
Continues below advertisement