Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन : CM Eknath Shinde
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन : CM Eknath Shinde
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द असल्याची ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिलीय. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एका महिन्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय..तर नोंदी सापडलेल्यांच्या कुटुंबीयांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.