Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 102व्या घटनादुरुस्ती विधेयकात होणार बदल ABPMajha

Continues below advertisement

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या निकालानंतर 102व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल करण्यात येणार आहे. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नव्या बदलांना मंजुरी दिली जाणार आहे. केंद्र सरकार बदल करणार असल्याची या विधेयकात माहिती आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विधेयकात बदल करून नवे एसईबीसी प्रवर्ग बनवण्याचा अधिकार राज्य सरकारांना मिळणार आहेत. 102व्या घटनादुरुस्तीमुळे एसईबीसीचे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार केंद्र सरकारलाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं. मराठा आरक्षणाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर राज्य सरकार आता कायद्यात बदल करणार आहे. 

मराठा आरक्षणाच्या निकालानंतर 102व्या घटनादुरुस्ती विधेयकात केंद्र सरकार बदल करणार असल्याची माहिती आहे. जे बदल करण्यात येतील त्या बदलांना केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विधेयकात बदल करून नवे एसईबीसी प्रवर्ग बनवण्याचा अधिकार राज्य सरकारांना मिळणार आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

5 मे 2021 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय जाहीर केला. या निकालात सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण अवैध ठरवलं होतं. या निकालानंतर केंद्र सरकारच्या वतीनंही एक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारनं दाखल केलेली याचिका केवळ 102व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर होती. म्हणजेच, नवा प्रवर्ग तयार करण्याचे अधिकार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला आहेत की, राज्यांनाही आहेत? या मुद्द्यावर होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram