Morning Prime Time : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 09:00AM : 12 September 2025 : ABP Majha

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील. जगदीप धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन यांचा विजय झाला होता. त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला असून, आता महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता आहे. सामना वृत्तपत्राने आज अग्रलेखातून संवैधानिक पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी घोडेबाजार करत असतील तर तो रोखणारा कायदा करण्याची मागणी केली आहे. "खुर्चीवर असल्यावर माणूस खरे रंग दाखवतो नव्या उपराष्ट्रपतींचा रंग काय ते लवकरच कळेल," असे सामनाने म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरवरून राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात वाद सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी जीआर कायदेशीर असल्याचे सांगितले, तर मंत्री छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनोज जरांग यांनी भुजबळांवर सरकार आणि मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा आरोप केला आहे. ओबीसी समाजाचा लवकरच मुंबईत महामोर्चा होणार आहे. सोलापुरातील कुडू गावकऱ्यांनी आज बंदची हाक दिली आहे. बीडच्या प्रकरणाशी तुलना केल्याने आणि मुरूम उपसा प्रकरणी झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. अजित पवारांनी मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेतला, ज्यावर ओबीसी नेत्यांनी टीका केली आहे. लक्ष्मण मानेंचे भटक्या विमुक्त जमातींना हैदराबाद गॅझेटनुसार आदिवासी प्रवर्ग समावेश करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola