Maratha Quota Row | Chhagan Bhujbal यांचा GR ला विरोध, मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, महायुतीत ठिणगी
मराठा आरक्षणासाठी Hyderabad Gazetteer लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने GR काढल्यानंतर महायुती सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि OBC नेते Chhagan Bhujbal यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील GR वरून राज्य सरकार विरोधात दंड थोपटला आहे. Chhagan Bhujbal यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या Pre-Cabinet बैठकीला हजेरी लावली होती, मात्र ती बैठक आटोपताच ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाता बाहेर पडले. Chhagan Bhujbal यांचा राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या GR ला विरोध असल्याचे समोर आले आहे. त्यांनी "जात बदलता येत नाही" अशी प्रतिक्रिया दिली असून, GR बाबत वकिलांचा सल्ला घेणार असल्याचे सांगितले. "कुठल्याही जातीला उचलून दुस-या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारलाच नाही," असे त्यांचे स्पष्ट मत आहे. OBC नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात या GR बद्दल मोठ्या शंका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते कायदेशीर मार्गाने न्यायालयात जाणार आहेत.