Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : अंतरवालीच्या पाटलांमुळे दोन समाजात अंतर, छगन भुजबळांची फटकेबाजी

Continues below advertisement
बीडमध्ये झालेल्या ओबीसी महाएल्गार सभेत (OBC Mahaelgar Sabha) मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. 'मराठा आणि ओबीसी समाजामध्ये अंतर पाडण्याचं काम अंतरवालीच्या दरिंदे पाटलांमुळे पडलंय', असा घणाघाती आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला. यावर प्रत्युत्तर देताना, कितीही दडपण आणले तरी ओबीसीमधूनच आरक्षण घेणार, असे मनोज जरांगे-पाटील यांनी ठणकावून सांगितले. भुजबळ यांनी मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणासाठी नेहमीच पाठिंबा दिला आहे, मात्र जरांगे-पाटील यांच्या भूमिकेमुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचे म्हटले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे मराठा आरक्षणाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola