OBC Maratha Protest : मनोज जरांगेंना आझाद मैदान पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना
Continues below advertisement
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांना समन्स बजावले आहे. परवानगीशिवाय मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी 'आज सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी हजर रहा', असे निर्देश दिले आहेत. जरांगे पाटील यांच्यासोबत पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांनाही आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या या आंदोलनादरम्यान जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणी जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी स्वतः हजर राहून बाजू मांडणार की वकिलामार्फत उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement