Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र
Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र
माओवाद्यांच्या स्पेशल झोनल कमिटीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय...या पत्रात माओवाद्यांनी सामूहिक आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त केलीये...महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील माओवाद्यांचा यातच समावेश आहे...तसंच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनाही हे पत्र लिहिण्यात आलंय...या पत्रात महाराष्ट्रात आत्मसंर्पण करणाऱ्या भूपती आणि छत्तीसगडमध्ये समर्पण करणाऱ्या सतीश या दोघांप्रमाणेच आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केलीये...माओवाद्यांनी चर्चा करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची मुदत मागितलीये...या मुदतीपर्यंत सुरक्षा दलांचे ऑपरेशन्स राबवले जाऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केलीये...
इतर महत्वाच्या बातम्या - 24 nov 2025 :
डॉ .गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाला अटक...वरळी पोलिसांकडून रात्री १ वाजता अनंत गर्जेला अटक केल्याची माहिती...
गळफास घेत आत्महत्या केलेल्या डॉ. गौरी पालवेवर आज अत्यसंस्कार...शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष...गौरी या पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नी...
आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा धडाका...फडणवीस शिंदेंच्या उत्तर महाराष्ट्रात प्रचारसभा...तर अजित पवारांचा मराठवाड्यात निवडणूक प्रचार
गाफिल राहू नका, अन्यथा येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असेल.. मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचा इशारा