Manoj Jarange vs Girish Mahajan : डेडलाईवरुन गरीश महाजनांची विनंती, मनोज जरांगे ठाम

Continues below advertisement

जालना : सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) दाखल झाले असून, बऱ्याच वेळ चालेल्या चर्चेतून कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यामुळे सरकार अन् मनोज जरांगेंमधील बैठक निष्फळ ठरली आहे. "नोंदी असलेल्या सबंधीत नातेवाईकांना आणि सर्व रक्तातील सगेसोयरे यांना हे प्रमाणपत्र मिळावे. रक्ताचे सगेसोयरे हा शब्द आपण गृहीत धरला होता. आमच्या मामाला किंवा मावशी यांना देखील प्रमाणपत्र मिळावे,” या मागणीवर जरांगे ठाम आहेत. मात्र, असे करता येणार नाही आणि तसा निर्णय देखील घेता येणार नसल्याचे गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले आहे. त्यामुळे आजची बैठक निष्फळ ठरली आहे.   

दरम्यान यावेळी बोलतांना गरीश महाजन म्हणाले की, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला हे आरक्षण द्यायचं आहे.  चर्चेची दारं खुली असली तर मार्ग निघेल. सोयरा शब्दावरून जरांगे आणि आमची वेगवेगळी मतं आहे.  विमल मुंदडा केसचा संदर्भ पाहता मुंदडा मुळच्या एससी होत्या. लग्नानंतर त्या मारवाडी झाल्या. त्यामुळे, ज्यांचे कुणबी दाखले आहेत ते ओबीसी आहेत. त्यांच्या रक्तातल्या नात्यातल्या लोकांना आरक्षण देणं बंधनकारक आहे, असेही महाजन म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram