Manoj Jarange Vashi Navi Mumbai : वाशीमध्ये जरांगे यांच्या सभेला गर्दी किती?
Manoj Jarange Vashi Navi Mumbai : वाशीमध्ये जरांगे यांच्या सभेला गर्दी किती?
मुंबई : मनोज जरांगे थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. दुपारी २ वाजता मनोज जरांगे आपली भूमिका मांडणार आहेत. मराठा आरक्षण मागणीसाठी वाशीमध्ये जमलेल्या लाखो जनसमुदायाने मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून रॅपिड अॅक्शन फोर्स नवी मुंबईत दाखल झाले आहे. तर मुंबई पोलीसांनी चेंबूर ते आझाद मैदानात जाणाऱ्या दोन्ही मार्गांची तयारी केली आहे.
मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. सीएसएमटीसमोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाशी टोलनाका येथे आता रॅपिड अॅक्शन फोर्सची टीम दाखल झाली आहे. या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल स्थानिक वाहतूक पोलीस नवी मुंबई पोलीस दाखल झाले आहेत.