Manoj Jarange : आरक्षणाबाबत सरकारचे 5 अध्यादेश, दुपारी मनोज जरांगे देणार माहिती ABP Majha
Continues below advertisement
वाशी : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत मराठा वादळ मुंबईत (Mumbai) येऊन धडकलं आहे. मुंबईत आल्यानंतर सरकारची धावाधाव सुरु झाली आहे. जरांगे पाटील मुंबईत पोहोचताच सरकारने पुन्हा त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सरकारकडून देण्यात आलेला प्रस्ताव आता मनोज जरांगे पाटील सभेच्या माध्यमातून समाजासमोर मांडणार आहेत. त्यांनी आपल्या सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या तमाम मराठा बांधवानो म्हणत सुरुवात एकच जल्लोष झाला. यावेळी झालेल्या गर्दीला शांत करत त्यांनी सरकारकडून देण्यात आलेल्या प्रस्तावाची आपल्याला माहिती देत असल्याचे सांगत शांततेचे आवाहन केले.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Vashi Maratha Aarakshan Navi Mumbai Maharashtra 'Eknath Shinde Manoj Jarange Patil 'Maharashtra