Manoj Jarange Special Report : मनोज जरांगेंचा विधानसभा लढण्याचा इशारा

Manoj Jarange Special Report : मनोज जरांगेंचा विधानसभा लढण्याचा इशारा

मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या नव्या इशाऱ्यामुळे राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे...सरकारनं मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिली असली तरी जरांगे मात्र सगेसोयऱ्यांच्या मागणीवर आजही ठाम आहेत. ती मागणी मान्य नाही झाली तर आंदोलनच्या मार्गावरून जरांगे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या राजकारणातल्या एन्ट्रीमुळे राजकीय पक्षांपुढे आव्हान निर्माण होणार का?...पाहुयात यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी केलेल्या उपोषणाचे पडसाद लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. अनेक मतदारसंघात ओबीसी आणि मराठा मतांचं ध्रुवीकरण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आता याचा नेमका फटका कुणाला बसतो आणि कुणाला फायदा होतो हे 4 जूनलाच कळेल. मात्र मनोज जरांगेंनी विधानसभेच्या आखाड्यात उमेदवार उतरवण्याबाबत दिलेला इशारा नक्कीच हलक्यात घेण्यासारखा नाहीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola