Manoj Jarange Speech Sambhajinagar : मंडल कमिशन 15 दिवसात बरखास्त करू शकतो, पण... : मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange Speech Sambhajinagar : मंडल कमिशन 15 दिवसात बरखास्त  करू शकतो, पण... : मनोज जरांगे

Manoj jarange Patil : विरोधकांनी बैठकीला जायलाच हवे होते. पण ते गेले नाही म्हणून तुम्ही ते कारण आम्हाला सांगणार का?  सरकार म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही का रोष अंगावर घेत आहात, अशी टीका मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) केली आहे. तसेच सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. सगेसोयची अंमलबजावणी घेणारच आहे. मी सरकारला सावध करतोय, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीबाबत सरकारला दिलेल्या अल्टीमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. यावरून मनोज जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

मनोज जरांगे म्हणाले की, अल्टीमेटमबाबत सरकारसोबत बोलणे झालेले नाही. आज सरकारला पूर्ण दिवस आहे. पुढील निर्णय काय घ्यायचा? हे समजाशी बोलून घेणार आहे. आजचा दिवस काही बोलता येणार नाही. आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे आहे. रॅलीचा पुढील टप्पा पश्चिम महाराष्ट्रात असेल. शिंदे समितीने नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे. मुलींच्या मोफत शिक्षणाचा विषय आहे. सर्व जाती धर्माच्या मुलांना न्याय मिळावा. आम्ही जातीयवादी नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram