Manoj Jarange PC Sambhajingar : मराठा समाजाचा रोष परवडणार नाही, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

Continues below advertisement

Manoj Jarange PC Sambhajingar : मराठा समाजाचा रोष परवडणार नाही, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही

मराठा आरक्षणाबाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, विरोधकांनी बैठकीला जायलाच हवे होते. पण ते गेले नाही. म्हणून तुम्ही ते कारण आम्हाला सांगणार का? तुम्ही सरकार आहात. विरोधक नाही आले तरी तुम्ही सांगितले पाहिजे, त्यांचे कारण सांगून तुम्हाला द्यायचे आहे नाही का? तुम्ही का रोष अंगावर घेत आहात. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. सगेसोयची अंमलबजावणी घेणारच आहे. मी सरकारला सावध करतोय. तुमच्यावर टीका करत नाही. पण आरक्षण दिले नाही तर 100 टक्के 288 उमेदवार पाडणार आहे. मराठ्यांच्या मताच्या जीवावरच आताचे आमदार झालेत, असे निशाणा त्यांनी यावेळी सरकारवर साधला. 

त्यांना संविधानाने दिलेला अधिकार

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सगेसोयरे अध्यादेशाला विरोध केला. याबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, द्या म्हणण्याचा नाही म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांना वाटलं असेल नाही द्यावे, म्हणून ते नाही म्हटले. त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. 

सरकार लबाड, ओबीसी नेत्यांना आमच्या अंगावर घालतंय

ते पुढे म्हणाले की, राज्यात मराठ्याच्या हातात पॉवर राहिली पाहिजे ही माझी भूमिका आहे. सगेसोयरे उडणारे असेल तर रद्द करा मागणी का होते? छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) का झोपत नाहीत. मी मराठ्यांना  काहीना काही देऊ शकलो. 100 टक्के मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिले आहे. मी काहीना काही समाजाला दिले ना. तुमच्यासारखं अर्ध्यात तर आंदोलन सोडले नाही ना? काही जणांना माझं आंदोलन पचणीच पडेना. 40 वर्ष तुम्ही काय केलं? जर आरक्षण उडणारे असते तर ओबीसीचे नेते एकत्र आलेच नसते. सरकार लबाड आहे. ओबीसींच्या नेत्यांना आमच्या अंगावर घालतेय. ओबीसींनी समजून घ्यावं विरोध केला नाही. तरी मराठ्यांचेच सरकार येणार, म्हणून तुम्ही विरोध करू नका. इतका मग्रूरराज कधीच असू नये, महिला रस्त्यावर उतरून सरकार ऐकत नाही. विरोधी पक्षाला 70 वर्ष मतदान केले. भाजप मधल्या सामान्य मराठ्यांना वाटायला लागले, हे कामाचेच नाही. सरकार ला सकाळी  उठायला वेळ लागतो. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram