Manoj Jarange Sabha : 22 ऑक्टोबरला मराठ्यांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरणार - मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange : 22 ऑक्टोबरला मराठ्यांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरणार - मनोज जरांगे
जालन्याच्या आंतरवाली सराटीममध्ये मराठा आरक्षणाचे उपोषकर्ते मनोज जरांगे यांची सभा झाली. सभेला मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या विराट सभेतून मनोज जरांगेंनी सरकारला शेवटचं अल्टिमेटम दिलंय... सरकारला दिलेल्या ४० दिवसांपैकी १० दिवस उरले असून या दहा दिवसांत आरक्षण द्या अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची.. असा इशारा जरांगेंनी दिला...शिवाय २२ ऑक्टोबरला पुढची दिशा ठरेल असंही जरांगे म्हणाले... या विराट सभेसमोर जरांगेंनी छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय... तसंच पंतप्रधान मोदींनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना समज द्यावी असंही जरांगे म्हणालेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram