Jarange vs Munde: 'चष्म्यावरून टीका करणाऱ्यांना उत्तर',काळा चष्मा घालून मनोज जरांगेंची घोडेस्वारी

Continues below advertisement
मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील कलगीतुरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'परळीचा चष्मेवाला म्हणून हिणवणाऱ्यांना आणि चष्मा घेऊन टाक म्हणणाऱ्यांना' उत्तर म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी काळा गॉगल लावून घोडेस्वारी करत स्टायलिश प्रत्युत्तर दिले आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) गावात एका कार्यकर्त्यांने आणलेल्या घोड्यावर बसून जरांगे यांनी फेरफटका मारला. काही दिवसांपूर्वी बीडमधील एका सभेत धनंजय मुंडे यांनी जरांगे यांच्यावर त्यांच्या चष्म्यावरून टीका केली होती. या टीकेला उत्तर म्हणूनच जरांगेंनी काळा चष्मा घालून घोडेस्वारी केल्याचे मानले जात आहे, ज्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha vs OBC) आरक्षणाच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola