Manoj Jarange on Devendra Fadnavis : फडणवीस, मी सागर बंगल्यावर येतो; माझा बळी घ्या - मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange on Devendra Fadnavis : फडणवीस, मी सागर बंगल्यावर येतो; माझा बळी घ्या - मनोज जरांगे मराठ आंदोलक मनोज जरांगेंनी प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीसांत्या सागर बंगल्यावर जाण्यावर जरांगे ठाम आहेत. त्यासाठी ते गाडीत बसून मुंबईच्या दिशेनं रवाना देखील झाले आहेत. मला सागर बंगल्यावर गोळ्या घातल्या तरी बेहत्तर, पण सग्यासोयऱ्यांचा निर्णय घेऊनच मी परत येणार अशी जरांगेंची भूमिका आहे. पत्रकार परिषद सुरू असताना जरांगेंनी अचानक मुंबईला निघण्याचा निर्णय घेतला, आणि ते गाडीकडे चालू लागले. या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले. फडणवीस, मी तुम्हाला राजकीयरित्य संपवून टाकेन, माझ्या नादी लागू नका,फडणवीस आणि भुजबळांना माझा जीव घ्यायचा आहे, सलाईनमधून विष देऊन मला हत्या करण्याचा कट रचला होता, आणि त्यामागे फडणवीसच होते असं जरांगे म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram