Manoj Jarange on CM Eknath Shinde : 'सगेसोयरे'वर अंमलबजावणी करावीच लागणार, जरांगेंचा अल्टीमेटम

Continues below advertisement

Manoj Jarange  on CM Eknath Shinde : 'सगेसोयरे'वर अंमलबजावणी करावीच लागणार, जरांगेंचा अल्टीमेटम  कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी आरक्षण (kunbi caste certificate) आणि कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना नवं आरक्षण (maratha reservation) असं सांगणं चुकीचं आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करावीच लागेल, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते अंतरवाली सराटीतून (Antarwali Sarathi) बोलत होते. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालवली होती, त्यामुळे राज्य सरकारने कोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाच्या निर्देशानंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेतलाय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण 20 तारखेला निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इसारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. यावेळी त्यांनी 10 टक्के आरक्षण ही टक्केवारी कशी आणली हे माहित नसल्याचं सांगितलं. त्याशिवाय सगेसोयरेची अंमलबाजवणी करावीच लागेल, असेही सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram