Manoj Jarange on Chhagan Bhujbal : भाजप संपायला आली तरी फडणवीस भुजबळांना सोडायला तयार नाही -जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : भाजप संपायला आली तरी फडणवीस भुजबळांना सोडायला तयार नाही -जरांगे  राज्याचं लक्ष लागलेल्या बीडमधील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची रॅली शांततेत पार पडली, आणि जरांगे पाटील यांच्या भाषणाने गाजली. बीडमधील (Beed) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरुन जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन सरकार आणि विरोधक दोघांवरही हल्लाबो केला. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal), बीडमधील मुंडे बंधु-भगिनींवर आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वांनाच बीडमधून फैलावर घेतल्याचं दिसून आलं. यावेळी, लोकसभा निवडणुकीत मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. केवश, ज्याला पाडायचंय, त्याला पाडा असं म्हटलं होतं. मात्र, आता विधानसभेला नावं घेऊन सांगणार आहे, ह्याला पाडा म्हणून, असे जरांगे यांनी म्हटले. तसेच, विधानसभा निवडणुकांसाठी दररोज 50 जण माझ्याकडे तिकीट मागायला येतात असेही जरांगे म्हणाले.    जरांगे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भाने राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही का, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला.   महाविकास आघाडीवर हल्लाबोल मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागतं का, असे म्हणत मनोज जरांगेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला, तसेच, हिंडू द्या त्यांना, वड्यावगळ्यानी कुठं हिंडायचंय ते. मला तर वाटतंय हे दोन्हीही एकच आहेत. कारण, तू मारल्यावनी कर, मी रडल्यावनी करतो, असंच यांचं काम दिसतंय. दोघेही एकमेकांवर का ढकलतात. जर महाविकास आघाडीवाले आले नाहीत, मग सरकारची इच्छाशक्ती असेल तर सरकार का करत नाही?. महाविकास आघाडी असू किंवा महायुती असो, कधीतरी जनतेकडे बघा. ते नाही आले म्हणता, मग तुम्ही का दिलं नाही. तुमचीच इच्छा नाही आम्हाला आरक्षण द्यायची, असे जरांगे यांनी म्हटले.   शिंदे-फडणवीसांना जरांगेंचा सवाल टेम्पो रिक्षावर असलेल्या मराठ्यांना वाटतं माझा मुलगा नोकरी करावा, माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना माझा सवाल आहे, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्यायचं नाही का?. शिंदेसाहेब तुम्हालाही सांगतो, आमचे आणखी किती बळी तुम्ही घेणार आहात. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आमच्या मराठा बांधवांचा एकदा उंबरा ओलांडला, तुम्हाला काळोख आणि काळोखच दिसेल, असे जरांगे यांनी म्हटले. माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा व्हावं, यासाठी मुलांनी, बापांनी आत्महत्या केल्या आहेत. कित्येक आया-बहिणीचं कुंकू पुसलंय. घरातला माणूस गेला, आरक्षणाने घात केला, उभा संसार जाळात होरपळतोय, असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्यकर्त्यांना सवाल केला आहे.   कुणबी म्हणून मराठा समाजाला ओबीसीत का नाही? तुम्ही फक्त मराठ्यांकडून खुर्च्या घेणार आणि तुम्हाला हवं तेच करणार. 83 क्रमांक हा कुणबी म्हणून आहे. ओबीसीमध्ये 180 जाती होत्या, पण आता 350 च्या जवळ जाती आहेत, ज्या जाती पोटजाती म्हणून ओबीसीमध्ये घेतल्या आहेत. मग, मराठा समाजालाही ओबीसीत का घेत नाहीत, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram