Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील
मनोज जरांगेंचा बबनराव लोणीकरांना खोचक टोला
भाजपचे नेते बबनराव लोणीकर म्हणाले की, 40 वर्ष मराठा मुख्यमंत्री होते. पण आरक्षण दिले आहे. आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, हो दिले ना. दोन अडीच करोड पोर लागली आमची नोकरीला. 13 तारखेपर्यंत थांबा, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Ptil) यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरु केले होते. राज्य सरकारच्या शिष्टाईने एक महिन्याचा कालावधी मागितल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केले. तर दुसरीकडे जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) रक्षणासाठी प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी या उपोषणाला भेट दिली. यानंतर त्यांनी राज्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत 'चुन चुन के गिरायेंगे' असा इशाराच दिला. आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश शेंडगे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. यामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. आज पत्रकरांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.