Jarange Attack Audio: जरांगे हत्या कट: आरोपीचा नवा व्हिडिओ, राजकीय वर्तुळात खळबळ
Continues below advertisement
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या गंभीर प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी दादा गरूड (Dada Garud) याचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यात तो मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना भेटल्याची कबुली देत आहे. ‘परळीतील शासकीय विश्रामगृहात अमोल खुणे आणि कांचन मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे हे दुसऱ्या खोलीत २५ मिनिटे बसले होते,’ असा दावा दादा गरूड याने या व्हिडिओमध्ये केला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा आणि या कटामागे धनंजय मुंडे असल्याचा थेट आरोप केला होता. आता या व्हिडिओमुळे त्यांच्या आरोपाला दुजोरा मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दादा गरूड आणि अमोल खुणे या दोघांना अटक केली असून, न्यायालयीन कोठडीत त्यांची चौकशी सुरू आहे. हा व्हिडिओ समोर आल्याने पोलीस तपासाला नवी दिशा मिळाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement