Manoj Jarange Palkhi Darshan | मनोज जरांगेंनी घेतलं तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन ABP Majha
मनोज जरांगे पाटील यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले मध्यरात्री एक वाजता पिराची कुरोली या ठिकाणी पालखी मुक्कामी असताना मनोज जरांगे पाटील पोहोचले आणि त्यांनी दर्शन घेतलं.. यासोबतच ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यात जाऊन मध्यरात्री जरांगे पाटील यांनी माऊली महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतलं.. दिवसा आल्यानंतर गर्दी होईल आणि वारकऱ्यांना त्रास व्हायला नको म्हणून मी रात्री आलो असे यावेळी जरांगे म्हणाले.. मनोज जरागे यांच्यासोबत बातचीत केली आहे गोविंद शेळके यांनी