Manoj Jarange On Vidhan Sabha : नऊ मंत्र्यांना पाडण्यासाठी जरांगेंनी विधानसभेसाठी कसली कंबर
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल (Maratha Reservation) बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एबीपी माझासोबत बोलताना दोन वक्तव्य केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत 9 मंत्र्यांचा पराभव करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले होते. 127 मतदारसंघांची चाचपणी केल्याची माहिती देखील मनोज जरांगे यांनी दिली होती. विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघांसाठी पडताळणी मनोज जरांगे सहा टप्प्यात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील मतदारसंघांची यादी समोर आली आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने 288 जागांपैकी आतापर्यंत 127 मतदारसंघाची चाचपणी करण्यात आली आहे. यात गेल्या 10 वर्षांपासून मराठा आमदार विजयी झालेले मराठा मतांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांना प्राधान्य देण्यात येत आहे. तर पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जालना ,बीड, धाराशिव जिल्ह्यातील काही मतदार संघाची चाचपणी करण्यात आली आहे .