Manoj Jarange : Navi Mumbai मधील सभेतून जरांगेंच्या कोणत्या 10 मागण्या केल्या?

Continues below advertisement

Manoj Jarange : Navi Mumbai मधील सभेतून जरांगेंच्या कोणत्या 10 मागण्या केल्या?

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीतून पायीदिंडी घेऊन मुंबईत धडक दिलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्याता आलेली समितीला मुदतवाढ  देण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांनी वर्षभर वाढवण्यासाठी मागणी केली होती. मात्र, सरकारने टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देण्यात येईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील गुन्हे मागे घेण्यात येणार 

मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी सोबतच पत्र देण्याची मागणी केली आहे.त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी सोबतच पत्र देण्याची मागणी केली आहे. 

त्या 37 लाख लोकांचा डेटा सरकारकडे मागितला

मनोज जरांगे म्हणाले की, सामान्य प्रशासन विभागाकडून सुमंत भांगे यांनी चर्चा केली. त्यांनी सरकारकडून कोणते निर्णय काय आहेत ते सांगितले. आम्ही 54 लाख नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी 37 लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. मात्र, जरांगे यांनी त्या 37 लाख लोकांचा डेटा सरकारकडे मागितला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram